Wednesday, 23 September 2015

नातं नको हिमालयातल्या शुभ् बर्फासारखं,
सुंदर असलं तरी कालांतराने वितळून जाणारं…

नातं असावं ओबड धॊबड दगडासारखं,
सगळ्या ऋतूंमधे अस्तित्व टिकून रहाणारं…!

नातं नको नदीच्या पात्रासारखं,
पाणी गोड असलं तरी त्याला मर्यादा असलेलं…

नातं असावं विशाल सागरसारखं,
खारं पाणी असलं तरी अथांग रूप असलेलं…!

नातं नको एखाद्या विद्युत रोषणाई सारखं,
झगमगाट असला तरी कृत्रिम भासणारं...

नातं असावं देवासमोरच्या समई सारखं,
छोट्या ज्योतीने मन प्रसन्न करणारं…

No comments:

Post a Comment